Dehuroad Corona Update : देहूरोडमध्ये 34  नवे रुग्ण; चिंचोलीत सर्वाधिक 13 रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत शनिवारी   (दि.10) 34  नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामध्ये एकट्या चिंचोलीत सर्वाधिक 13 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

त्यामुळे हद्दीतील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 1862 इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने शनिवारी रात्री साडे वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, कॅंटोन्मेंट हद्दीत सध्या  241 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचा आणि नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. तर कोरोना उपचार पूर्ण झालेल्या 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 38 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 1585 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. होम आयसोलेशनमध्ये 146 रुग्ण आहेत.

महात्मा गांधी शाळेतील कोविड सेंटरमध्ये  51 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. पीसीएमसी कोविड सेंटर येथे 3 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत हद्दीत एकूण 36 मृत्यूंची नोंद झाली आहे.

शनिवारी आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे

चिंचोली (13), इंद्रपूरम (3), श्रीविहार (2), किन्हई (2), झेंडे मळा (2), शितळानगर नं. 2(2), मेन बाजार (1), लक्ष्मी पुरम (1) दत्तनगर (1), इंद्रप्रस्थ (1),थॉमस कॉलनी (1), शिवाजीनगर (1), उदयगिरी सोसायटी (1), मामुर्डी (1), आंबेडकर नगर (1), बरलोटा नगर (1).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.