Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 4 रुग्णांना डिस्चार्ज ; एका पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणात घट होत आहे. आज, मंगळवारी कोरोनामुक्त झालेल्या 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एका नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामध्ये चिंचोली रुग्णाचा समावेश आहे. 

दरम्यान, आज मेन बाजार, पारशी चाळ, गांधीनगर, आंबेडकर नगर, इंदिरा नगर, पंडित चाळ या भागातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. तसेच एकूण 05 नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1282 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आजपर्यंत एकूण 1227 ग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 16 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये केवळ एका रुग्णावर उपचार सुरु आहे. सध्या हद्दीत 21 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 5 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 34 इतकी झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.