Dehuroad Corona Update : देहूरोडमध्ये आज 40 जणांना डिस्चार्ज; 18 नवे रुग्ण, 255 सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत (दि. 16) एकूण 18 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आज कोरोना मुक्त झालेल्या 40 जणांना डिस्चार्ज तर हद्दीतील सक्रिय रुग्णांची संख्या 255 इतकी आहे. दरम्यान, हद्दीतील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 2002 इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.

कॅंटोन्मेंट हद्दीत सक्रिय रुग्णांचा आणि नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, आज कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी 7.20 वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या 47  रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 1709  रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

होम आयसोलेशनमध्ये 164 रुग्ण आहेत. महात्मा गांधी शाळेतील कोविड सेंटरमध्ये  43 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. पीसीएमसी कोविड सेंटर येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत हद्दीत एकूण 38  मृत्यूंची नोंद झाली आहे.

शुक्रवारी आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे

चिंचोली (03), किन्हई (2), थॉमस कॉलनी (2), मेन बाजार (2), लक्ष्मी पुरम (2), आंबेडकर नगर (2), एल्लोरा सोसायटी (2), इंद्रपूरम सोसायटी (1), वृंदावन सोसायटी (1), मामुर्डी (1).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.