Dehuroad Corona Update : देहूरोडमध्ये तब्बल 42 रुग्णांची नोंद; सक्रिय रुग्णसंख्या 184

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज बुधवारी (दि.7) 42 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे हद्दीतील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 1767 इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली. 

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, बुधवारी रात्री पावणे नऊ वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1767 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.  हद्दीत सध्या 184 सक्रिय रुग्ण आहेत.

आज मिळालेल्या आकडेवारीनुसार झेंडेमळा, एल्लोरा सोसायटी आणि थॉमस कॉलनी येथे प्रत्येकी ५, सिद्धिविनायक नगरी येथे ४, संकल्प नगरी, चिंचोली आणि लक्ष्मी पुरम येथे प्रत्येकी ३ रुग्णांची नोंद झाली.

_MPC_DIR_MPU_II

तसेच शिवाजीनगर, शितळानगर नंबर 2, वृंदावन सोसायटी,आंबेडकर नगर आणि अलकापुरी येथे प्रत्येकी 2 रुग्ण, तर मेन बाजार, सर्वत्र नगर, कोहिनुर बिल्डींग, किन्हई येथे प्रत्येकी एक अशा एकूण 42 नव्या रुग्णांची नोंद झाली.

सध्या 31 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आतापर्यंत एकूण 1547 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. होम आयसोलेशनमध्ये 101 रुग्ण असून हद्दीत एकूण 147 सक्रिय रुग्ण आहेत.

सीजिएच कोविड सेंटरमध्ये सध्या 49 रुग्ण दाखल आहेत. पीसीएमसी कोविड सेंटर येथे 3 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत हद्दीत एकूण 36 मृत्यूंची नोंद झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.