Dehuroad Corona Update : देहूरोडमध्ये दोन दिवसांत तब्बल 60 नवे रुग्ण; 33 रुग्णांना डिस्चार्ज, एक मृत्यू

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रविवारी (दि.11 ) आणि सोमवारी(दि.12) या दोन दिवसात एकूण 60 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कोरोनामुक्त झालेल्या 33 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एका कोरोनाबळीची नोंद झाली आहे.

त्यामुळे हद्दीतील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 1922 इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने सोमवारी रात्री साडे वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, कॅंटोन्मेंट हद्दीत सध्या 267 सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचा आणि नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. तर कोरोना उपचार पूर्ण झालेल्या 33 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

सध्या 39  रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 1618 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. होम आयसोलेशनमध्ये 164 रुग्ण आहेत. आज झेंडेमळा येथील 65वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला.

महात्मा गांधी शाळेतील कोविड सेंटरमध्ये  61 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. पीसीएमसी कोविड सेंटर येथे 3 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत हद्दीत एकूण 37 मृत्यूंची नोंद झाली आहे.

दोन दिवसांत आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे

चिंचोली (11),मेन बाजार (8) किन्हई (7),इंद्रप्रस्थ (4),थॉमस कॉलनी (4), दत्तनगर (3), गांधीनगर (3), झेंडे मळा (3), लक्ष्मी पुरम (2) शिवाजी नगर (2), एल्लोरा सोसायटी (2),श्रीकृष्ण नगर (2), गॅरिसन ऑफिस (2), शितळानगर नं 2(1), मामुर्डी (1), बरलोटा नगर (1), शितळानगर नं 1(1), पारशी चाळ (1), वृंदावन सोसायटी (1), संकल्प नगरी (1).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.