Dehuroad Corona Update : कॅंटोन्मेंट हद्दीत 8 जणांना डिस्चार्ज, 4 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीत आज, शुक्रवारी ( दि.04 ) 4 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर कोरोनातून बरे झालेल्या 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 97 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने शुक्रवारी ( दि.04 ) सायंकाळी साडे पाच वाजता कोरोना अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

या अहवालानुसार  आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 2807 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 643 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हद्दीत आजवर 67 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 97 सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी सध्या 21 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर, 47 रुग्ण होम आयसोलेट आहेत.  27 रुग्णांवर महात्मा गांधी स्कूलमधील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. पुणे शहरातील कोविड सेंटर आणि देहूगांव येथील कोविड सेंटरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण दाखल आहेत.

आज आढळलेले नवीन रुग्ण

थॉमस कॉलनी (2), शेलारवाडी (1), शीतलानगर नं.1(1).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.