Dehuroad Corona Update : ऑक्टोबरमध्ये नव्या रुग्णांमध्ये मोठी घट; कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढतेय

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत कोरोनाच्या नवीन रुग्णांसह ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये कमालीची घट होत आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. आज, मंगळवारी 9 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर पोर्टर चाळ, किन्हई, प्रियदर्शनी बिल्डिंग या भागात प्रत्येकी एक अशा तीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1234 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

कोरोनातून बरे झालेल्या 9 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एकूण 1171 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 10 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 10 रुग्णांवर तर पीसीएमसी कोविड सेंटर येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. सध्या 29 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी  8 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 34 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.