Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत कोरोना रुग्णांनी ओलांडला एक हजाराचा टप्पा ; आज 15 रुग्णांना डिस्चार्ज; 4 नवीन रुग्णांची भर

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीत चिंचोली येथे 2, तर श्रीकृष्ण नगरआणि संकल्प नगरी (1) येथे प्रत्येकी 1 अशा एकूण 4 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आज, सोमवारी नोंद झाली. यामुळे हद्दीतील कोरोना रुग्णांनी एका हजाराचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना बाधित एकूण रुग्णांची संख्या 1005 इतकी झाली आहे.

तर कोरोनावर यशस्वी मात केलेल्या एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1005 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, सोमवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 4 नवीन रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 1005 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आज,15 रुग्ण कोरोनातून बरा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 844 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या 134 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

यापैकी सध्या 12 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 62 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये कॅन्टोन्मेंट हद्दीतील 36 आणि हद्दीबाहेरील 26 रुग्णांचा समावेश आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिका कोविड सेंटरमध्ये 3 रुग्णावर उपचार सुरु आहेत.

83 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 27 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.