Dehuroad Corona Update : देहूरोडमध्ये 32 नव्या रुग्णांची भर; 34 जणांना डिस्चार्ज, 147 सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज सोमवारी (दि.5) 34 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे हद्दीतील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 1704 इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली. 

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, रात्री नऊ वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1704 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.  कोरोना उपचारातून बरे झालेल्या 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज मिळालेल्या आकडेवारीनुसार मेन बाजार येथे 5, चिंचोली येथे 3, बरलोटा नगर, थॉमस कॉलनी, अलकापुरी, संकल्प नगरी , उदयगिरी, प्रियदर्शनी बिल्डिंग येथे प्रत्येकी इंद्रपूरम, एल्लोरा सोसायटी, सर्वत्र नगर, इंद्रायणी दर्शन, किन्हई, आंबेडकर नगर, प्रियदर्शनी सोसायटी येथे प्रत्येकी 2 आणि शितळा नगर नं. 1, इंद्रायणी दर्शन, किन्हई, इंद्रप्रस्थ सोसायटी, गुरुद्वारा, साई गॅलॅक्सि, शिवाजीनगर, लक्ष्मी पुरम येथे प्रत्येकी एक अशा एकूण 32 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

सध्या 20 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आतापर्यंत एकूण 1521 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. होम आयसोलेशनमध्ये 76 रुग्ण असून हद्दीत एकूण 147 सक्रिय रुग्ण आहेत.

सीजिएच कोविड सेंटरमध्ये सध्या 55 रुग्ण दाखल आहेत. पीसीएमसी कोविड सेंटर येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.