Dehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 16 रुग्णांना डिस्चार्ज; 14 नवीन रुग्णांची भर

आजपर्यंत हद्दीत एकूण 841 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीत संकल्पनगरी, भारतरत्न सोसायटी, मेन बाजार येथील प्रत्येकी 3, तर दत्तनगर, चिंचोली, पोर्टर चाळ, थॉमस कॉलनी आणि गांधी नगर या भागात प्रत्येकी एक अशा एकूण 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आज, मंगळवारी नोंद झाली. दरम्यान, आज कोरोना उपचारातून बरे झालेल्या 16 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत हद्दीत एकूण 841 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 14 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 827 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर एकूण 681 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

यापैकी सध्या 25 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 39 रुग्णांना, हिंजवडी येथील विप्रो कोविड केअर सेंटर येथे एक आणि देहूगावातील कोविड केअर सेंटर येथे दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

71 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 22 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.