Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 55 रुग्णांना डिस्चार्ज; 14 नवीन रुग्णांची नोंद

आजपर्यंत हद्दीत एकूण 881  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीत संकल्पनगरी येथे तीन, मुंबई -पुणे रोड, मेन बाजार, थॉमस कॉलनी या भागात प्रत्येकी दोन, तर किन्हई, श्रीकृष्ण नगर, शेलारवाडी, सर्वत्रनगर, सिद्धिविनायक नगरी या भागात प्रत्येकी एक असे एकूण कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 14 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर कोरोनावर यशस्वी मात केलेल्या 55 रुग्णांना आज, सोमवारी डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कॅण्टोन्मेट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

आजपर्यंत हद्दीत एकूण 881  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 14 नवीन रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 899 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आज, 55 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 764 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या 109 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

यापैकी सध्या 21 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 30 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये कॅन्टोन्मेंट हद्दीतील 26 आणि हद्दीबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे. तर एका रुग्णावर मोशी कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

61 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, चिंचोली येथील 65  महिलेचा कोरोनामुळे आज, सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 26 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.