Dehuroad Corona Update : कॅंटोन्मेंट हद्दीत तीन रुग्णांचा डिस्चार्ज; केवळ एका पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मोठ्याप्रमाणात घट होत आहे. आज, शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एका नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामध्ये चिंचोली येथील रुग्णाचा समावेश आहे. 

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1287 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आजपर्यंत एकूण 1238 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 12 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये सध्या कोणताही रुग्ण उपचारासाठी दाखल नाही, तर हद्दीत 14 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 2 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 35 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.