Dehuroad Corona Update : कॅंटोन्मेंट हद्दीत आज एका रुग्णाला डिस्चार्ज; नवीन रुग्णांची नोंद नाही
एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज (शनिवारी ) कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. आज नवीन रुग्णांची नोंद झाली नाही. त्यामुळे हद्दीत सध्या 8 ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.
कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1341 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
त्यातील एकूण 1298 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या 7असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
महात्मा गांधी कोविड सेंटरमध्ये सध्या एकही रुग्ण दाखल नाही. कोरोनामुळे आजपर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.