Dehuroad corona Update : आज 41रुग्णांना डिस्चार्ज; 6 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

आजपर्यंत हद्दीत एकूण 622 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले. : Discharged 41 patients today; Record of 6 new corona positive patients

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीतील शितळानगर नं 2, धनश्री निवास (उदयगिरी ), शिवाजी नगर (मुंबई पुणे रस्ता ), मेन बाजार (सेवा विकास बँक परिसर ) या भागात आज, सोमवारी 6 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.  आज, 41रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत हद्दीत एकूण 622 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 6 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 622 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 37 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

तर तीन रुग्णांना देहूगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर एका रुग्णाला तळेगाव दाभाडे येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

79 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 39 रुग्ण उपचार घेत आहे. आज, 41रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 447रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 16 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.