Dehuroad Corona Update : कॅंटोन्मेंट हद्दीत आज पाच रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज (शुक्रवारी ) पाच कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आज नवीन रुग्णांची नोंद झाली नाही. त्यामुळे हद्दीत सध्या 9 ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, रात्री नऊ वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1341 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

त्यातील एकूण 1297 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या 6 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड सेंटरमध्ये 2 रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. तर रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहे.

कोरोनामुळे आजपर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.