Dehuroad Corona Update : थॉमस कॉलनीत एकाच कुटुंबातील चौघे पॉझिटिव्ह
एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवाळीनंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आज, शनिवारी थॉमस कॉलनी येथील एकाच कुटुंबातील चौघे पॉझिटिव्ह असल्याची नोंद झाली आहे. तर कोरोना मुक्त झालेल्या दोघांना डिस्चार्ज देणात आला असल्याची माहिती कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून देण्यात आली.
कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1324 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यातील एकूण 1273 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 4 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
महात्मा गांधी कोविड सेंटरमध्ये एक रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. तर हद्दीत 14 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 11रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.