Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 21 जणांना डिस्चार्ज; 11 नव्या रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत (दि.15) एकूण 11  नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आज कोरोना मुक्त झालेल्या 21 जणांना डिस्चार्ज तर हद्दीत 277 क्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, हद्दीतील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 1984 इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.

कॅंटोन्मेंट हद्दीत सक्रिय रुग्णांचा आणि नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, आज कॅंटोन्मेंट हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटली आहे. आज कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने गुरुवारी  सायंकाळी सव्वा सात वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या 49  रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 1669  रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

होम आयसोलेशनमध्ये 165 रुग्ण आहेत. महात्मा गांधी शाळेतील कोविड सेंटरमध्ये  61  रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. पीसीएमसी कोविड सेंटर येथे 2  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत हद्दीत एकूण 38  मृत्यूंची नोंद झाली आहे.

गुरुवारी आढळून आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे

लक्ष्मी पुरम (3), मेन बाजार (2), चिंचोली (2), शीतला नगर नं 1(1), शेलारवाडी (1), दत्तनगर (1), आंबेडकर नगर (1)येथील आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.