Dehuroad Corona Update: कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज एकही नवा रूग्ण नाही, 49 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज एकही कोरोना रूग्णाची नोंद झाली नाही तसेच आज एक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. दिलासादायक बाब म्हणजे आज तब्बल 49 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 483 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी सध्या 41 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, 310 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 29 लक्षणे विरहित (असिम्पटोमॅटिक) रुग्ण एम जी स्कूल येथील कोरोना सेंटर मध्ये ऍडमिट आहेत. हद्दीतील 28 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

कॅन्टोन्मेंट हद्दीत आजवर 14 कोरोना बाधिता रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हद्दीत 89 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत एकही  नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली नाही तसेच एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.