Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णाची नोंद नाही

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवाळीनंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली होती.  मात्र, गेल्या दोन दिवसांपासून  हद्दीत नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही. तर  हद्दीमध्ये 16 ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून देण्यात आली.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, सोमवारी  सायंकाळी  साडे  सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1324 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यातील एकूण 1273 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 4 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड सेंटरमध्ये एक रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. तर हद्दीत 16  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 11रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.