Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत एक जणाला डिस्चार्ज, सक्रिय रुग्णांची संख्या 15 वर
एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत गेल्या दोन दिवसांपासून हद्दीत नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही. आज बऱ्या झालेल्या एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, हद्दीत 15 ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून देण्यात आली.
कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, मंगळवारी (दि.1) सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1,324 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यातील एकूण 1,274 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 4 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
महात्मा गांधी कोविड सेंटरमध्ये एक रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. तर हद्दीत 15 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 10 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.