Dehuroad Corona Update : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात फक्त 9 सक्रिय रुग्ण, आज एकही नवा रुग्ण नाही

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात आज एकही नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली नाही. बोर्डात आता फक्त नऊ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी चार रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर, पाच रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने आज सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात आतापर्यंत 1 हजार 295 रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यापैकी 1 हजार 251 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. बोर्डातील कोरोना रिकव्हरी रेट 96.52 टक्के एवढा आहे. आजवर हद्दीतील 35 रुग्ण दगावले आहेत.

दरम्यान, रुग्णालयात दाखल असलेल्या व डिस्चार्ज दिलेल्या सर्व रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे अहवालात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.