Dehuroad Corona Update : टेलिफोन एक्सचेंज परिसरात एका पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, शनिवारी देहूरोड टेलिफोन एक्सचेंज परिसरातील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे हद्दीत सध्या 9 ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून देण्यात आली.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, शनिवारी सायंकाळी साडे चार वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1334 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यातील एकूण 1290 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 4 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड सेंटरमध्ये 4 रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. तर रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहे. कोरोनामुळे आजपर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.