Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 13 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; 8 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत थॉमस कॉलनी येथे आज, मंगळवारी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत एकूण 109 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. हद्दीतील चिंचोली येथे एक, मामुर्डी येथे 2  आणि थॉमस कॉलनी येथे 10  अशा एकूण 13 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1169 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवारी रात्री साडे वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’  या मोहिमे अंतर्गत थॉमस कॉलनी या भागामध्ये घरोघरी जाऊन पल्स ऑक्सिमीटरने तपासणी, थर्मल स्कॅनिंग करण्यात आले. तसेच लायन्स क्लब व सेंट जॉर्ज शाळेमध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली.

आज 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आजपर्यंत एकूण 1048 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या 91 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 11 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 45 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. होम आयसोलेशनमध्ये 35 रुग्ण आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 30 इतकी झाली आहे.

उद्या ‘या’ भागात होणार घरोघरी तपासणी

दरम्यान, उद्या ( बुधवारी दि. 30) शिवाजीनगर, राजीव गांधीनगर, उदयगिरी, मेहता पार्क, के. एम. पार्क, शीतलानगर नं 2, कुणाल हॉटेलसह परिसरातील सर्व बिल्डिंग येथे घरोघरी तपासणी होणार आहे. तसेच शिवाजी विद्यालय व दत्तमंदिर (शिवाजीनगर ) या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट होणार आहे. या भागातील सर्व नागरिकांनी घरी राहून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.