Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 19 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद ; 9 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत ‘माझे कुटुंब माझी जाबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत पारशी चाळ, मेन बाजार, पोर्टर चाळ, पोलीस कॉलनी, एलआयजी क्वार्टर, इंद्रायणी दर्शन या परिसरात घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच वैश्य मंदिर, हनुमान मंदिर व देहूरोड पोलीस स्टेशन या ठिकाणी रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. दिवसभरात श्रीकृष्ण नगर येथे 1, मेन बझार,शेलारवाडी आणि मामुर्डी येथे प्रत्येकी 3 रुग्ण,उदयगिरी आणि पारशी चाळ येथे प्रत्येकी 2, तर पोलीस लाईन येथे सर्वाधिक 5 अशा एकूण 19 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

कोरोनातून बरे झालेल्या 9 रुग्णांना घरी सोडण्यात आले असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1189 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’  या मोहिमेतपारशी चाळ, मेन बाजार, पोर्टर चाळ, पोलीस कॉलनी, एलआयजी क्वार्टर, इंद्रायणी दर्शन या परिसरात घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच वैश्य मंदिर, हनुमान मंदिर (अबूशेठ रोड ) व देहूरोड पोलीस स्टेशन या ठिकाणी रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली.

दिवसभरात श्रीकृष्ण नगर येथे 1, मेन बझार,शेलारवाडी आणि मामुर्डी येथे प्रत्येकी 3 रुग्ण,उदयगिरी आणि पारशी चाळ येथे प्रत्येकी 2, तर पोलीस लाईन येथे सर्वाधिक 5 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

आज 9 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आजपर्यंत एकूण 1061 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 59 आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 29 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या 96 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 8 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 32 इतकी झाली आहे.

उद्या ‘या’ भागात होणार घरोघरी तपासणी

उद्या, शुक्रवारी आंबेडकर नगर, गांधीनगर, इंदिरानगर, पंडित चाळ येथे घरोघरी तपासणी होणार आहे. तसेच उर्दू शाळा व विशाल मित्र मंडळ या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट होणार आहे. या परिसरातील सर्व नागरिकांनी घरी राहून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.