Dehuroad Corona Update : इंद्रायणी दर्शन, शितलानगर येथे दोन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; एका रुग्णाला डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, मंगळवारी इंद्रायणी दर्शन, शितलानगर क्र. १ येथे दोन नव्या रुग्णांची नोंद झाली. तर कोरोनामुक्त झालेल्या एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. हद्दीत सध्या अवघे 6 ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून देण्यात आली.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1331 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यातील एकूण 1290 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 3 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड सेंटरमध्ये तीन रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. कोरोनामुळे आजपर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.