Dehuroad Corona Update : कॅंटोन्मेंट हद्दीत आज तीन रुग्णांना डिस्चार्ज ; नवीन रुग्णांची नोंद नाही

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, शनिवारी नव्या रुग्णांची नोंद झालेली नाही. मात्र, कोरोनामुक्त झालेल्या तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. हद्दीत सध्या अवघे 8 ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून देण्यात आली.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1325 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यातील एकूण 1282 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 3 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण उपचारासाठी दाखल नाही. सध्या 5 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.