Dehuroad Corona Update : आज 17 रुग्णांची भर, दोघांचा मृत्यू, 16 रुग्णांना डिस्चार्ज

आजपर्यंत हद्दीत एकूण 680 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीतील सिद्धिविनायक नगरी, काळोखे मळा, श्रीविहार, बरलोटानगर, शेलारवाडी, थॉमस कॉलनी (नाल्याजवळ ), चिंचोली, दत्तनगर, शितलानगर नं. 1, कोटेश्वरवाडी, आंबेडकरनगर या भागात आज, गुरुवारी 17 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.  तर आज, दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

आजपर्यंत हद्दीत एकूण 680 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, गुरुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 17 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. तर थॉमस कॉलनी (आझाद नगर ) येथील 57 वर्षीय महिला आणि शिवाजीनगर येथील 45 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे हद्दीतील कोरोना मृत्यांचा आकडा 19वर पोहोचला आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 680 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 36 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 37 रुग्णांना, तर एका रुग्णाला तळेगाव दाभाडे येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

109 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आज 16 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 478 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 19 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.