Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 7 नव्या रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत आज, बुधवारी ( दि. 26) 7 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. सध्या 119 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. 

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने बुधवारी (दि.25) रात्री साडे नऊ वाजता कोरोना अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

या अहवालानुसार  आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 2730 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 हजार 544 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलेला नाही.

हद्दीत आजवर 67 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 119 सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी सध्या 20 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर,62 रुग्ण होम आयसोलेट आहेत तर, 37 रुग्णांवर महात्मा गांधी स्कूलमधील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

आज आढळलेले नवीन रुग्ण

गांधी नगर (1), शीतलानगर नं. 1(1), किन्हई (2), शगुन सोसायटी (3).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.