Dehuroad Corona Update : कॅंटोन्मेंट हद्दीत दोन पॉझिटिव्ह रुग्ण; शेलारवाडी आणि मेन बाजारातील रुग्णाचा समावेश

0

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत गेल्या पाच दिवसांत एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नव्हती. मात्र, आज, बुधवारी हद्दीत दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यामध्ये एक रुग्ण शेलारवाडी तर दुसरा रुग्ण मेन बाजारातील असल्याची माहिती कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून देण्यात आली.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1310 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आजपर्यंत एकूण 1259 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 11 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये आज एक रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आला. तर हद्दीत 16 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 4 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.