Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 25 रुग्णांना डिस्चार्ज; केवळ एका रुग्णाची नोंद

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, सोमवारी 25 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एल्लोरा सोसायटी, मेन बाजार आणि सिद्धिविनायक नगरी या भागात प्रत्येकी एक अशा तीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1231 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

कोरोनातून बरे झालेल्या   25 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एकूण 1162 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 19 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 7 रुग्णांवर तर पीसीएमसी कोविड सेंटर येथे एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. सध्या 35ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी  8 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 34 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.