Dehuroad Corona Update : रिपब्लिक स्कूल परिसरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

 एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज ( बुधवारी ) मेन बाजारातील रिपब्लिक हायस्कूल परिसरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे हद्दीतील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 13 इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, रात्री साडे आठ वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1363 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्या पैकी सध्या 5 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

_MPC_DIR_MPU_II

आतापर्यंत एकूण 1315 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. होम आयसोलेशनमध्ये 8 रुग्ण असून हद्दीत एकूण 13  सक्रिय रुग्ण आहेत.

सीजिएच कोविड सेंटरमध्ये सध्या एकही रुग्ण दाखल नाही. कोरोनामुळे आजपर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like