Dehuroad Corona Update : चिंचोली येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत चिंचोली येथे आज (मंगळवारी ) दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे हद्दीतील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4 इतकी झाल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, सायंकाळी साडे सहा वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1385 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आज चिंचोली येथील दोन रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर सध्या एका रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आतापर्यंत एकूण 1345 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. होम आयसोलेशनमध्ये 3 रुग्ण असून हद्दीत एकूण 4 सक्रिय रुग्ण आहेत. तर कोरोना मुक्त झालेल्या दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सीजिएच कोविड सेंटरमध्ये सध्या एकही रुग्ण दाखल नाही. कोरोनामुळे आजपर्यंत 36 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.