Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 13 नवीन रुग्णांची नोंद; 4 जणांना डिस्चार्ज

आजपर्यंत हद्दीत एकूण 749 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीत आज, बुधवारी अशोक नगर, मेन बाजार, एमबी कॅम्प, नायडू नगर, मामुर्डी, चिंचोली, संकल्प नगरी या भागात प्रत्येकी एक, थॉमस कॉलनी, गांधी नगर, श्रीकृष्ण नगर या परिसरात प्रत्येकी दोन, अशा एकूण 13 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड  वैद्यकीय विभागाच्यावतीने देण्यात आली.

आजपर्यंत हद्दीत एकूण 749 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, बुधवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 13 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 749 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 27 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 34 रुग्णांना, हिंजवडी येथील विप्रो कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

75 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आज 4 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 593 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 19 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.