Dehuroad : नगरसेवक खंडेलवाल गोळीबार प्रकरणातील साबीर शेख टोळीवर मोक्का

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक विकास खंडेलवाल यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

साबीर समीर शेख (वय 19, रा. देहूरोड), जॉनी उर्फ साईतेजा शिवा चिंतामल्ला (वय 19, रा. देहूरोड), आफताब समीर शेख (रा. देहूरोड) अशी मोक्काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबीर शेख आणि त्याच्या साथीदारांवर मागील काही दिवसांपूर्वी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये नगरसेवक खंडेलवाल यांनी पुढाकार घेऊन देहूरोड बाजारपेठ बंद ठेवल्याचा राग आरोपींच्या मनात होता. विकासनगर देहूरोड येथे खंडेलवाल यांचे कार्यालय आहे. 13 जून रोजी सायंकाळी ते कार्यालयात आले. कार्यालयातील कामकाज आटोपून सायंकाळी साडेसातच्या सुमारास कार्यालयाच्या बाहेर त्यांचा चालक महंमद शेख व रमजान यांच्याशी उद्याच्या कार्यक्रमाची चर्चा करत होते.

त्यावेळी दुचाकीवरून दोन हल्लेखोर आले. त्यातील एकाने दुचाकीवरून खाली उतरून खंडेलवाल यांना शिवीगाळ करून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. खंडेलवाल मागे सरकल्यामुळे त्यांना गोळी लागली नाही. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खंडेलवाल ओरडत पळत असताना पाय-यांवर पडले. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायाला मार लागला. दरम्यान, घटना घडल्यानंतर खंडेलवाल यांच्या ओळखीचे राजेश खंडेलवाल आरोपींच्या दिशेने पळाले असता आरोपींनी राजेश यांना पिस्तुलाचा धाक दाखवून दोन्ही आरोपी मोटारसायकल वरून पळून गेले.

  • देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल देखील जप्त केली. आफताब शेख अद्याप फरार आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी आरोपींवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठवला. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मान्यता देऊन तिघांवर मोक्काच्या कारवाईचे आदेश दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.