Dehuroad Crime : दुचाकीवरून पडलेली लॅपटॉप बॅग क्षणार्धात पळवली

एमपीसी न्यूज – रस्त्याने जात असताना खड्ड्यातून दुचाकी गेल्याने दुचाकीवरून लॅपटॉप बॅग रस्त्यावर पडली. दुचाकी थांबवून मागे येईपर्यंत अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप बॅग चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 31) सकाळी आठ वाजता तळवडे चौक, समर्थ हॉस्पिटल समोर घडली.

सुलेमान अबूबकर काझी (वय 31, रा. पाषाण, पुणे) यांनी याबाबत शनिवारी (दि. 31) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काझी शनिवारी सकाळी कंपनीत दुचाकीवरून जात होते. तळवडे चौकात समर्थ हॉस्पिटलसमोर आल्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. त्यावेळी दुचाकीवर ठेवेलेली लॅपटॉप बॅग रस्त्यावर पडली. काझी यांनी दुचाकीचा वेग कमी करून दुचाकी रस्त्याच्या बाजूला थांबवली आणि लॅपटॉप बॅग पडलेल्या ठिकाणी आले.

दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची 55 हजार रुपये किमती लॅपटॉप असेलेली बॅग चोरून नेली. त्यामध्ये काझी यांचे पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे होती. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.