Dehuroad : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – एकतर्फी प्रेमातून मागील तीन वर्षांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. तसेच मुलीच्या मित्र-मैत्रिणींमध्ये तिची बदनामी केली. याबाबत एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद जाधव (वय 21, रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2017 पासून एप्रिल 2020 या कालावधीत देहूगाव येथे घडली. आरोपीने फिर्यादी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही सन 2017 पासून तिचा अनेक वेळा पाठलाग केला. तिच्या कॉलेजमध्ये जाऊनही तिचा पाठलाग करत तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले.

तसेच तिचे अफेअर चालू आहे, असे तिच्या सर्व मित्र मैत्रिणींना सांगून तिची बदनामी केली. आरोपीने फिर्यादी मुलीच्या नातेवाईकांना तसेच मित्र-मैत्रिणींना अनेकवेळा शिवीगाळ करून धमकावले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.