Dehuroad : गुटखा विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

Crime against one for selling gutkha

एमपीसी न्यूज – प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 21) सकाळी दहा वाजताच्या सुमारास मेन बाजार, देहूरोड येथे करण्यात आली आहे.

रियाज अजीज शेख (वय 40, रा. मेन बाजार, देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संतोष शामराव सावंत (वय 33, रा. पिंपळे गुरव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुगंधित तंबाखू, विमल पान मसाला हे अन्न पदार्थ असुरक्षित असल्याने शासनाने त्याच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्री करण्यावर बंदी घातली आहे.

प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला आरोपीने विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांनी आरोपी रियाज शेख याच्या दुकानावर कारवाई केली. दुकानातून 19 हजार 305 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.