Dehuroad : बनावट ओळखपत्र बाळगणा-या तोतया पोलिसावर गुन्हा

एमपीसी न्यूज – पोलिसांचे बनावट ओळखपत्र बाळगणे तसेच कारला काळी फिल्म बसवल्याप्रकरणी एका तोतया पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलिसांनी सेंट्रल चौक येथे ही कारवाई केली.

कल्पेश वसंतराव भालेराव (वय 35, रा. कमान, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रवींद्र वसंतराव आघाव यांनी फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास तळेगावकडून कात्रजच्या दिशेने जाणा-या कारला (एमएच 14 / जीएच 4795) अडवले. कारच्या खिडक्यांना काळ्या फिल्म बसवल्या होत्या.

अशा काचांवर शासनाने बंदी घातली असल्याचे सांगत देहूरोड पोलीस कारचालकावर कारवाई करत होते. त्यावेळी कल्पेश याने तो पोलीस दलात असल्याचे सांगत सातारा पोलीस दलाचे ओळखपत्र दाखवले. मात्र, हे ओळखपत्र बनावट असल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.