Dehuroad Crime : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर वार

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) रात्री आठ वाजता मामुर्डी स्मशानभूमीजवळ घडली.

_MPC_DIR_MPU_II

प्रवीण नवनाथ शिंदे (वय 23, रा. मामुर्डी, ता. हवेली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी रविवारी (दि. 22) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अविनाथ आव्हाड (वय 21), गणेश रवी जाधव (वय 21, रा. मामुर्डी, ता. हवेली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांचे नीरा विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दुकान बंद करून शिंदे घरी आले. त्यानंतर मासे पकडण्यासाठी ते मामुर्डी स्मशानभूमीजवळ नदीवर गेले. मासे पकडत असताना रात्री आठ वाजताच्या सुमारास आरोपी तिथे आले. त्यांनी शिंदे यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये शिंदे जखमी झाले. शिंदे यांनी आरोपींसोबत झटापटी करून पोहून नदीची दुसरी बाजू गाठली. दरम्यान आरोपी तिथून पळून गेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.