Dehuroad: गुन्हे शाखा युनिट पाचची धडक कारवाई, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यातील तिघांना अटक

Dehuroad: Crime Branch Unit 5 strikes, three fugitives arrested in three different cases एक तरुण मोपेड दुचाकीवरून देहूरोड सेंट्रल चौकात आला. त्याला पोलिसांची चाहूल लागताच त्याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले.

एमपीसी न्यूज- दरोड्याच्या वेगवेगळ्या गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. या तीनही कारवाया पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने केल्या आहेत.

पहिल्या कारवाईमध्ये शुभम गोविंद झगडे (वय 19, रा मु.पो. शेरी, कोरेगाव भिमा जवळ, पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे) या तरुणाला बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

रविवारी (दि. 21) गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस देहूरोड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी धनंजय भोसले यांना माहिती मिळाली की, एक इसम पांढ-या रंगाच्या मोपेड दुचाकीवरून (एमएच 14 एफएच 7246) मुकाई चौक येथून सेंट्रल चौक देहूरोडकडे पिस्टल विक्रीसाठी येणार आहे.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला. एक तरुण मोपेड दुचाकीवरून देहूरोड सेंट्रल चौकात आला. त्याला पोलिसांची चाहूल लागताच त्याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी एकूण 83 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

आरोपी शुभम याच्याकडे असलेले पिस्टल त्याने विक्रीसाठी आणले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी शुभम याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दुस-या कारवाईमध्ये ऋतिक श्रीपती सुर्यवंशी (वय 22, रा. राजनगर, निगडी) याला अटक केली आहे. तो मागील दोन वर्षांपासून दरोड्याचा गुन्ह्यात फरार होता.

शनिवारी (दि. 20) गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस नाईक फारुख मुल्ला यांना माहिती मिळाली की, देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका दरोड्याचा गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेला आरोपी आझाद चौक, निगडी येथे येणार आहे.

त्यानुसार आझाद चौकात सापळा रचून पोलिसांनी ऋतिक सूर्यवंशी याला अटक केली. अटक टाळण्यासाठी तो मागील दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

युनिट पाचने शनिवारी (दि. 20) आणखी एक कारवाई करत देहूरोड पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे. दिनेश उमापती हेगडे (वय 20, रा. शितळानगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस नाईक नितीन बहिरट यांना माहिती मिळाली की, सन 2019 मध्ये देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी शितळानगर देहूरोड येथील कुणाल हॉटेल जवळ येणार आहे.

त्यानुसार पोलिसांनी आरोपी दिनेश हेगडे याला शिताफीने पकडले. वरील तीनही आरोपींना पुढील कारवाईसाठी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरील तीनही कारवाया पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर गाडेकर, मयुर वाडकर, दत्तात्रय बनसुडे, दयानंद खेडकर, फारुक मुल्ला, संदिप ठाकरे, धनराज किरनाळे, गणेश मालुसरे, सावन राठोड, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, भरत माने, नितीन बहिरट, राजकुमार इघारे, श्यामसुंदर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे, राजेंद्र शेटे व नागेश माळी यांच्या पथकाने केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.