Dehuroad Crime : लाऊड स्पीकर लावून कंपनीत गोंधळ घालणाऱ्या 13 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीत लाऊड स्पीकर लावून गोंधळ घालणाऱ्या 13 जणांवर देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 11) रात्री नऊ वाजता तळवडे येथील श्री टूल्स अँड स्टम्पिंग कंपनीत घडला.

प्रशांत वासुदेव बोंडे (वय 43, रा. मोशी), रजनीश रामलखन त्रिपाठी (वय 34, रा. चिखली), मिलिंद रामचंद्र नाफळे (वय 32, रा. चिखली), ज्ञानेश्वर भीमाशंकर कोलते (वय 35, रा. येलवाडी), सारंग मेघशाम कोल्हे (वय 28, रा. मोशी), अमित विनायक चौधरी (वय 28, रा. आकुर्डी), दीपक रामहृदय शुक्ला (वय 28, रा. चिखली), अकबर शेख (वय 30, रा. तळवडे), जयदेव मारुती चोपकर (वय 34, रा. मोशी), संतोष वामन पाटील (वय 30, रा. चिखली), दीपक बाबा देशमुख (वय 40, रा. तळवडे), नारायण दिनकर जूनघरे (वय 33, रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक अशोक पारधी यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तळवडे येथील श्रीटूल्स अँड स्टम्पिंग या कंपनीत दारू पिऊन मोठ्या आवाजात विनापरवाना लाऊडस्पीकर लावले. सर्व आरोपी लाऊड स्पीकर लावून गोंधळ घालत होते. तसेच आरोपींनी स्वतःच्या आणि कंपनीतील इतर कामगारांच्या जीवाला कोरोना साथीचा धोका निर्माण केला. दरम्यान कंपनीचा मालक इंगळे तिथून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.