Dehuroad Crime : दहशत निर्माण करून मारहाण करणा-या आठ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घातक हत्यारांनी तरुणाला व त्याच्या मित्रांना मारहाण करून जखमी केले. याबाबत आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 29) एम बी कॅम्प, देहूरोड येथे दुपारी पाच वाजता घडली.

_MPC_DIR_MPU_II

कीच्या चिन्ना स्वामी, वीरा चिन्ना स्वामी, उनडगली चिन्नास्वामी, आकाश मुर्गवेल स्वामी, आबीनाथ मुर्गवेल स्वामी, राजकुमार कलीमूर्ती सतवेल चिन्नास्वामी, टीकुर चिन्नास्वामी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. किशन कलीमूर्ती असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत किशनची आई पुनीत शिवशुगण कलीमूर्ती (वय 44, रा. एमबी कॅम्प, देहूरोड) यांनी गुरुवारी (दि. 29) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पाच वाजता आरोपी प्राणघातक हत्यारे घेऊन एमबी कॅम्प येथील सार्वजनिक पाण्याच्या नळाजवळ आले. त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून दहशत निर्माण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड, बिअरच्या बाटल्या, दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.