_MPC_DIR_MPU_III

Dehuroad Crime : गहाण ठेवलेली कार मूळ मालकाच्या नकळत परस्पर विकली

एमपीसी न्यूज – गहाण ठेवलेली कार मूळ मालकाच्या नकळत परस्पर विकली. याबाबत एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 मार्च 2020 ते 12 नोव्हेंबर 2020 या कालावधीत देहूरोड येथे घडला.

_MPC_DIR_MPU_IV

मिलन उर्फ मिलिंद गोसावी (रा. कात्रज, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत संजय धोंडीराम वंजारी (वय 51, रा. देहूगाव) यांनी गुरुवारी (दि. 12) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय यांनी त्यांची पाच सीटर इको कार (एम एच 12 / जी के 0737) आरोपी मिलिंदकडे 40 हजार रुपयांना गहाण ठेवली. त्याची दरमहा चार हजार रुपयांप्रमाणे संजय परतफेड करत होते. असे असताना मिलिंद याने संजय यांच्या परस्पर त्यांची गाडी अभय शेलार आणि मोसीन शेख यांनी 1 लाख 25 हजारांना विकली.

गाडीबाबत मिलिंद यांनी विचारले असता गाडीवर झाड पडले असून गाडी गॅरेजमध्ये रिपेअरिंगला लावली आहे. त्याचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे देऊन मिलिंद याने गाडी देण्यासाठी टाळाटाळ करत फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.