Dehuroad Crime News : ‘दोन लाख रुपये द्या, नाहीतर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करेन’ अशी 17 व्यापाऱ्यांना धमकी; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ‘दोन लाख रुपये द्या, नाहीतर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करेन’ अशी धमकी एकाने देहूरोड येथील 17 व्यापाऱ्यांना दिली. याबाबत देहूरोड व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांनी पैसे मागणाऱ्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना 27 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता देहूरोड येथील सुभाष चौक, मेन बाजार येथे घडली.

अमित माणिक छाजेड (रा. पोर्टरचाळ, देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी विनय महावीर बारलोटा (वय 33, रा. लेखाफार्म, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने त्याचे उपोषण मागे घेण्यासाठी देहूरोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून फिर्यादी बरलोटा यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील आरोपीने फिर्यादी यांना दिली.

आरोपीने सुरुवातीला सवाना चौकात फिर्यादी यांना देहूरोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष या नात्याने भेटायला बोलावले. फिर्यादी भेटायला गेले असता ‘मला सर्व व्यापारी संघटनेकडून दोन लाख रुपये द्या. नाहीतर मी तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने 27 ऑगस्ट रोजी पुन्हा फिर्यादी यांना फोन करून दोन लाखांची मागणी केली. यामध्ये देहूरोड परिसरातील 17 व्यापारी आहेत, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.