-MPC-TOP-MOST-BANNER-I

Dehuroad Crime News : घरफोडी करून 20 तोळे दागिने आणि रोख रक्कम चोरीला

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथे घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे वीस तोळे सोन्या-चांदीचे दागिने आणि तीस हजारांची रोख रक्कम चोरून नेली आहे.

हा प्रकार 25 मे ते एक जून या कालावधीत क्यू बिल्डींग, ध्रुवदर्शन सोसायटी, सेक्टर 26, निगडी प्राधिकरण येथे घडली. याबाबत 20 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

श्रिजित अजिथन वर्मा (वय 34, रा. क्यू बिल्डींग, ध्रुवदर्शन सोसायटी, सेक्टर 26, निगडी प्राधिकरण) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वर्मा 25 मे रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या पत्नीसह भोर येथे गेले होते. दरम्यान त्यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी चार लाख 35 हजार 106 रुपये किमतीचे एकूण 207 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि तीस हजारांची रोख रक्कम चोरून नेली. 1 जून रोजी फिर्यादी घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी 20 दिवसानंतर गुन्हा नोंदवला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.