Dehuroad crime News : सेंट्रल चौकात केमिकल मिश्रित पाणी घेऊन जाणारा कंटेनर उलटला

एमपीसी न्यूज – केमिकल मिश्रित पाणी घेऊन जाणारा कंटेनर पुणे- मुंबई महामार्गावर देहूरोड येथील सेंट्रल चौकात उलटला. कंटेनर किवळेकडून जुना पुणे-मुंबई महामार्गाकडे जाताना आज (मंगळवारी) पहाटे हा अपघात घडला.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज, मंगळवारी पहाटे आठ ते दहा टाक्या केमिकल मिश्रित पाणी घेऊन जाणारा कंटेनर ( एम एच 46 / एच 8500 ) चालकाचे नियंत्रण सुटल्याने सेंट्रल चौकात उलटला. कंटेनरमधील सात ते आठ टाक्या खाली पडल्या होत्या. टाकीत कोणते केमिकल होते याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

रस्त्यावर पडलेल्या टाक्या क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढण्यात आल्या. कंटेनर पूर्ववत केल्यानंतर चालक कंटेनर घेऊन निघून गेला. दरम्यान, या अपघातात कोणीही जखमी झालं नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.