Dehuroad crime News : दारूच्या नशेत चोरी करण्यासाठी गेलेला चोरटा गजाआड

एमपीसी न्यूज – दारूच्या नशेत चोरी करण्यासाठी एका बिल्डींगमध्ये गेलेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 5) देहूरोड येथील कांता बिल्डींग येथे घडला.

साईनाथ तुकाराम काळे (वय 30, रा. खरोसा, लातूर. सध्या रा. किवळे, ता. हवेली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी किशोर मोहनलाल जैन (वय 45, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साईनाथ हा चोरी करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या कांता बिल्डींगमध्ये आला. त्याला फिर्यादी यांनी इथे का आलास असा जाब विचारला असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

तसेच तो दारूच्या नशेत असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यांनी साईनाथ याला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि गुन्हा नोंदवला. पोलिसांनी साईनाथ याला अटक केली आहे.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.