Dehuroad crime News : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस रुपीनगर परिसरात पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत होते.

एमपीसी न्यूज – बलात्काराचा गुन्हा करून पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाला यश आले आहे. या पथकाने आज (शनिवारी, दि. 29) रुपीनगर येथे ही कारवाई केली.

तानाजी महादेव नाईकवाडे (वय 34, रा. रुपीनगर, तळवडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सुमारे सहा महिन्यांपूर्वी आरोपी तानाजी याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा केल्यापासून आरोपी तानाजी पोलिसांना चकमा देत होता.

_MPC_DIR_MPU_II

गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस रुपीनगर परिसरात पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत होते.

त्यावेळी पोलीस नाईक निशांत काळे, पोलीस शिपाई राजेश कौशल्ये यांना माहिती मिळाली की, देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी तानाजी रुपीनगर येथील एकता चौकात थांबला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी एकता चौकात सापळा लावला आणि शिताफीने तानाजी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तानाजी याने गुन्हा केल्याचे कबूल केले.

पुढील कारवाईसाठी आरोपी तानाजी याला देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.