Dehuroad Crime News : कोयता घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून जाणाऱ्या तरूणाला अटक

एमपीसी न्यूज – शिवीगाळ करत ‘हात पाय तोडून टोकतो’, अशी धमकी देत मारण्याच्या उद्देशाने अंगावर धावून जाणा-या तरूणाला अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (दि.17) देहूरोड बाजारातील गणपती मंदिरासमोर रात्री आठ वाजता ही घटना घडली.

आरबाज फारूक शेख ( वय 22, रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शाहिद बादशाह शेख (वय 21, रा. गांधीनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहिद यांनी भांडणप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या तक्रारी बाबत आरोपीच्या मनात राग होता. रागातून त्याने हातात कोयता घेऊन शिवीगाळ करत फिर्यादी यांना मारण्याच्या उद्देशाने अंगावर धावून गेला. दाखल फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक कोकाटे करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.