Dehuroad Crime News : गांजा विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; एकास अटक

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 51 हजार 250 रुपये किमतीचा दोन किलो 20 ग्रॅम गांजा तसेच 50 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण एक लाख एक हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या आरोपीसह त्याला गांजा पुरवणा-याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नानासाहेब विष्णू महापुरे (वय 28, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. माहीम, पाटील वस्ती रस्ता, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह विकी लोंढे (रा. टेंभुर्णी, जि. सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी दिनकर परशुराम भुजबळ यांनी या प्रकरणी शनिवारी (दि. 4) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महापुरे हा मुकाई चौकाकडून आदर्श नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विक्रीसाठी गांजा घेऊन जात असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (दि. 4) दुपारी पावणे दोनच्या सुमारास कारवाई करून महापुरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 51 हजार 250 रुपये किमतीचा दोन किलो 20 ग्रॅम गांजा व 50 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एक लाख एक हजार 250 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपी विकी लोंढे याच्याकडून हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याचे आरोपी महापुरे याने पोलिसांना सांगितले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.